जिल्हा काँग्रेसचे बॉस खासदार मुकुल वासनिक उद्या जिल्ह्यात! लोणार मध्ये येणार; वाचा कसा आहे दौरा...

 
mv
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा काँग्रेसमध्ये ज्यांचा शब्द अंतिम असतो ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते, जिल्हा काँग्रेसचे बॉस, राज्यसभा खासदार मुकुल वासनिक उद्या ,२५ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील काँग्रेसचे नेते वासनिक यांची भेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 

उद्या, सकाळी खा.वासनिक दिल्लीवरून नागपूरसाठी प्रयाण करतील. सकाळी पावणेसात वाजता ते नागपूर विमानतळावर पोहचतील. त्यानंतर लोणारकडे रवाना होतील. सकाळी साडेदहाला लोणार येथे पोहचून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम द्वारे आयोजित संकल्प सभेला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी २ ला ते छत्रपती संभाजीनगरला रवाना होतील. सायंकाळी पावणेसात वाजता ते विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत.