जिल्हा काँग्रेसचे बॉस खासदार मुकुल वासनिक आज आणि उद्या जिल्ह्यात! सेटिंग लावण्यासाठी पुढारी पुढे पुढे करणार..!कसा आहे दौरा वाचा...

 
mv
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा काँग्रेसमध्ये आजही ज्यांचा शब्द अंतिम आहे असे सध्याचे राज्यसभा खासदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक आज २० मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज आणि उद्या ते जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. उद्या दुपारी किंवा संध्याकाळी ते नागपूरला रवाना होतील. दरम्यान बऱ्याच दिवसानंतर होणाऱ्या या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार मुकुल वासनिक यांनी भेट घेण्यासाठी काँग्रेस पुढारी धडपड करतांना दिसण्याची शक्यता आहे.
 

  आज संध्याकाळी ४ वाजता मुकुल वासनिक बुलडाणा शहरात दाखल होतील. त्यानंतर एका खाजगी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतरचा संपूर्ण वेळ त्यांनी राखीव ठेवला आहे. यावेळेत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी ते महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाल्यानंतर ते पहिल्यांदाच बुलडाण्यात येत आहेत त्यामुळे आमदार धिरज लिंगाडे यांच्या निवासस्थानी ते भेट देण्याची शक्यता आहे. उद्या २१ मे च्या सकाळी ९ वाजता ते नांदुऱ्याकडे प्रयाण करतील. तिथल्या भेटी आटोपून मेहकर कडे प्रयाण करतील.मेहकर येथे दुपारी १ वाजता एका विवाह सोहळ्याला ते भेट देतील त्यानंतर नागपूर कडे प्रयाण करणार आहेत.