BREKING जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तुपकरांना भेटले; राज्य सरकारचा महत्वाचा निरोप पोहचवला; आंदोलन स्थगित करण्याची विनंती; काय आहे राज्य सरकाचा निरोप? पुढे काय झालं? वाचा....

 
Xhjm
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईला निघाले आहेत. दरम्यान मार्गातील बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या जांब येथे जिल्हा प्रशासन व पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतली.
Dvb
दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी तुपकर यांचा ताफा जांब गावात पोहचला. त्याआधीच सहाय्यक जिल्हाधिकारी विंचनकर, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्यासह अनेक अधिकारी जांब येथे पोहचले होते. जांब गावात तुपकरांना थांबवून अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करीत राज्य सरकारच्या वतीने आलेला निरोप तुपकरांना कळविण्यात आला. राज्य सरकारने तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे उद्या बैठक होणार आहे. बैठकीची वेळ मात्र अद्याप निश्चीत नाही. दरम्यान मात्र असे असले तरी तुपकर शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. "बैठक लावल्याबद्दल धन्यवाद मात्र बैठकीत आमच्या मागण्यांवर अपेक्षित निर्णय झाला नाही तर मंत्रालयाचा ताबा घेणारच." अशी घोषणा तुपकर यांनी केली. सरकारसोबत बैठक होत नाही तोपर्यंत अन्नत्याग सुरूच असल्याचे तुपकर म्हणाले..