"ग्राम परिवर्तनाची वारी,आमदार आपल्या दारी" अंतर्गत वरखेड येथे बांधकाम कामगारांना सेफ्टी किटचे वितरण! आमदार श्वेताताईंची संकल्पना..

 
चिखली
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आधार बहुउद्देशीय फाउंडेशन च्या वतीने चिखली मतदारसंघात ग्राम परिवर्तनाची वारी आमदार आपल्या दारी ही संकल्पना गावोगावी राबवली जात आहे. या अंतर्गत विविध लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ देण्यासाठी आ. महाले स्वतः लक्ष घालून प्रयत्न करत आहोत. विविध योजनांपैकी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण विभागामार्फत बांधकाम कामगारांना ग्रामदुतांच्या माध्यमातून दि. २ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वरखेड येथे सेफ्टी कीटचे वितरण करण्यात आले. 
सेवालय या आ. श्वेताताई महाले यांच्या कार्यालयामधून " ग्राम परिवर्तनाची वारी आमदार आपल्या दारी " या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामदूतांतर्फे मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाते. गरजू व पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनेचे लाभ मिळावे यासाठी आ. श्वेताताई महाले जातीने लक्ष घालून या संकल्पनेचा पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी ठिकठिकाणी लाभार्थ्यांपर्यंत लाभ देखील पोहोचत असल्यामुळे मतदारसंघातील ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक, दलित, अल्पसंख्यांक आदी विविध समाज घटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 
           
वरखेड येथे झालेल्या सेफ्टी किट वितरण प्रसंगी गणेश भगत ता. उपाध्यक्ष भाजप, भारत सोळंकी सोशल मीडिया मंडळ संयोजक भाजपा, रवी भगत शिवसेना उपतालुका प्रमुख, लक्ष्मण शेळके, अरुण गायकवाड, संदीप म्हस्के, गणेशराव अंभोरे, भारत म्हळसने, विजय येवले, सुधाकर मोरे, अमोल जाधव, अनिल जाधव, समाधान कणखर, देविदास कणखर, दत्तात्रय कणखर, सुलोचनाबाई कणखर, ईदुबाई मुंढे, गजानन कणखर, अविनाश भगत, अनिल कणखर, सुनील कणखर, श्रीराम कणखर, दीपक भगत, मनोहर भगत, विनोद कणखर सरपंच, उपसरपंच महादेव वाकोडे, संदीप मुंढे, पवन कणखर, उषा कणखर, नंदाबाई वाकोडे, जया कणखर, नीळकंठ थाबडे, भारत कणखर, भागवत मुंढे, राजू पांचाळ आदी उपस्थित होते.