जिल्हा कचेरीवर धडकला धनगर समाजाचा मोर्चा! सत्तेत असो वा नसो आयुष्यभर धनगर समाजासाठी झटण्याचा आमदार संजय गायकवाडांचा शब्द!

 
aandolan

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी जय मल्हार...च्या घोषणेने परिसर दणाणून गेला. धनगर समाजाच्या विकासासाठी आपण आयुष्यभर झटणार, अशी ग्वाही आ. संजय गायकवाड यांनी यावेळी दिली.

ऑल इंडिया मल्हार नवयुवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, यासाठी हा लढा सुरू करण्यात आला आहे. तहसील चौकातील प्रस्तावित अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला अभिावादन करून मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना आ. संजय गायकवाड म्हणाले, आपण लहान होतो, तेव्हा आपल्या आजोबांनी आपल्याला वाघ्या मुरळीच्या झोळीत टाकले होते. मला समजते तेव्हापासून धनगर समाजाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहे. भविष्यात सत्तेत असो वा नसो, मात्र धनगर समाजाच्या भल्यासाठी मी सातत्याने झटणार आहे, त्यांच्या विकासासाठी माझा सहभाग राहणार आहे. नंदू लवंगे हे मागील अनेक वर्षांपासून माझ्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून धनगर समाजासाठी काम करत आहेत. भविष्यातही मी त्याच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनीदिली. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गातील प्रमाणपत्रासंदर्भातील प्रश्न लवकरच वरिष्ठ पातळीवर मीटिंग घेऊन मांडणार असून, केंद्र शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचेही आ. गायकवाड म्हणाले.

या मोर्चात सचिन सपकाळ, राम गडकर, राम जुमडे, विष्णू साखरे, अनिल ढवळे, दिलीप दिवटे, धनंजय शेंदळे, भरत किसन शेजोळ, धनश्री खाटेकर, मंगला लवंगे, सुमन सपकाळ, सिंधू सुसर, सुलोचना जुमडे, उषा चाटे, मंगला ढवळे, अरुणा सुशिर, सुनीता साखरे, संगीता ढवळे, राधा गावडे, लक्ष्मी ढवळे, सिंधू सुशिर यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.या मागण्यांकडे वेधले लक्ष

एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र द्यावे, मेंढपाळांना वनचराईसाठी कायमस्वरुपी पास द्याव्या, जालना येथील समाजबांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, या मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.