चिखली विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात! आज पुन्हा १४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन; सातगाव भुसारी अन् सोनवाडीची तहान भागवण्यासाठी १ कोटी ५८ लाख!

संध्याकाळी ६ ला केळवद येथे भूमिपूजन सोहळा ! कोलारीच्या पाणीपुरवठा योजनेचेही भूमिपूजन..!
 
mahale
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन सोहळे संपन्न होत आहेत. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून तर आ. श्वेताताईंनी विकासकामांचा धडाका लावलाय. शहरी असो की ग्रामीण भाग प्रत्येक ठिकाणी विकासगंगा पोहचवण्याचा निर्धार आ. श्वेताताईंनी केलाय. काल,२० फेब्रुवारीला मंगरूळ  नवघरे, इसोली सर्कल मध्ये ९ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. श्वेताताईंच्या हस्ते झाले होते. आज,२१ फेब्रुवारीला केळवद येथे संध्याकाळी ६ ला ११ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न  होणार आहे. खा. प्रतापराव जाधव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

Ghuu

आज,२१ फेब्रुवारीच्या सकाळी  ९ वाजता सातगाव भुसारी येथे जलजिवन मिशन अंतर्गत १ कोटी ३४. ८२ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न झाले. सोनेवाडी येथे २३ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. त्यानंतर आज सायंकाळी केळवद व कोलारी येथे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुधा केसापुर शिरपूर वाडी - धोडप या प्रमुख जिल्हा मार्गाची सुधारणा करण्याच्या ११ कोटी २५ लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता कोलारी येथे जलजिवन मिशन अंतर्गत १ कोटी ९ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रंगणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.