BREAKING रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय आला! वाचा जेल मिळाली की बेल...

 
Fgb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तेसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर आज मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. अनेक दिवसांपासून या निर्णयाची प्रतीक्षा होती.बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांचा जामीन रद्द करत तुपकर यांना तुरुंगात टाकण्याची विनंती मा.न्यायालयाकडे केली होती.
१५ फेब्रुवारीला सुनावणी झाल्यानंतर आज,२१ फेब्रुवारीला निर्णय येणार होता. दोन तासांपूर्वी तुपकर जिल्हा न्यायालयात दाखल झाले होते. दोन तासांपासून दोन्ही पक्षांचे वकील जोरदार युक्तिवाद करीत होते. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा.न्यायालयाने रविकांत तुपकर यांना तुरुंगात पाठवण्याची पोलिसांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाबाहेर तुपकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे..(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)