मतमोजणी अपडेट!अनिल अंमलकारांच्या मतपत्रिकेवर दुसऱ्या पसंतीची मते कुणाला? थोड्याच वेळात ठरणार अमरावती विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाचा आमदार

 
Hhjdrj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारीला पार पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी काल २ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेपासून सुरू आहे. २८ तास उलटूनही अजूनही निकाल जाहीर झालेला नाही.

पहिल्या पसंतीच्या ४७१०१ मतांचा कोटा अजून कुणीच पूर्ण केलेला नसल्याने दुसऱ्या पसंतीचे मते मोजण्यात येत आहे. शेवटचे वृत्त साडेबाराला हाती आले तेव्हा कमी मते मिळवणारी १९ क्रमांकाचे उमेदवार सरनाईक बाद करण्यात आले होते. त्या उमेदवारांच्या मतपत्रिकेवर असलेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.  लिंगाडे यांना पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मिळून आतापर्यंत ४४४४८ मते मिळाली असून रणजित पाटील यांना  ४१८९६ एवढी मते मिळाली आहेत. सध्या विसावे उमेदवार डॉ.प्रवीण रामभाऊ चौधरी यांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीची मते मोजणे सुरू आहे.चौधरी यांना पहिल्या पसंतीची १६९५ मते मिळाली आहे. चौधरी यांच्यानंतर ४१८८ मते मिळवणाऱ्या वंचितच्या अनिल अंमलकारांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात येतील. तोपर्यंत कुणीच  ४७१०१ मतांचा कोटा पूर्ण केला नाही तर दुसऱ्या क्रांमकावरील उमेदवाराला मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते मोजल्या जातील. तरीही कोटा पूर्ण झाला नाही तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला मिळालेली दुसरी पसंतीची मते मोजल्या जातील.

एवढे होऊनही कोटा पूर्ण झालाच नाही तर कोट्याच्या अगदी जवळपास मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जाईल. तूर्तास लिंगाडे यांना कोटा पूर्ण करण्यासाठी २६५३ तर रणजित पाटील यांना ५२०५ मतांची गरज आहे.