काँग्रेसचे विलास चव्हाण भाजपात जाणार! उद्या होणार प्रवेश; म्हणाले, आमदार श्वेताताईंच्या नेतृत्वावर विश्वास! माजी आमदार राहुल बोंद्रेंचे आहेत निकटवर्तीय...

 
Vvb
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकेकाळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय राहिलेले विलास चव्हाण उद्या,११ नोव्हेंबरला भाजपात प्रवेश करणार आहेत. आपला आमदार श्वेताताईंच्या नेतृत्वावर विश्वास आहे असं विलास चव्हाण यांनी पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला म्हटल आहे.
  Add
                           जाहिरात 👆
विलास चव्हाण यांच्यासोबत उद्योजक - युवकांची मोठी टीम देखील भाजपात प्रवेश करणार आहे. चव्हाण सिड्स आणि माऊली पेट्रोल पंपाचे संचालक असलेल्या विलास चव्हाण यांचा शेतकरी वर्गाशी स्नेहाचा संबंध आहे. याशिवाय तरुण - उद्योजकांची मोठी फळी चव्हाण यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी राहुल बोंद्रे यांचे कट्टर समर्थक म्हणून विलास चव्हाण यांची ओळख होती, मात्र आता काँग्रेसला धक्का देत विलास चव्हाण उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत.