Amazon Ad

चिखलीत काँग्रेसचा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात मोर्चा; पण मोर्चात दिसले भलतेच ; ज्यांचा शहराशी संबंधच नाही, त्यांच्या हाती दिसले शहरातील समस्यांचे बोर्ड! भाडोत्री आंदोलक आणल्याची चर्चा....

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने चिखलीत काल, ३० नोव्हेंबरला नगरपरिषद प्रशासनाविरोधात डफडे बजाव मोर्चा निघाला.."चिखली नगरपालिकेत कमीशन खोरी चालू आहे,शहराला पिवळ्या रंगाचा दूषित पाणीपुरवठा सुरू आहे, डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांनी शहरात थैमान घातले आहे." असा आरोप यावेळी बोलतांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला. नगरपालिकेने वेळीच कारभार सुधारावा अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही असा इशाराही राहुल बोंद्रे यांनी दिलाय..दरम्यान आता या मोर्चानंतर मात्र मोचार्त उपस्थित असलेल्या काही लोकांबद्दल सवाल उपस्थित केले जात आहेत. जे चिखली शहराचे नागरिक नाहीत, ज्यांचा नगरपालिका प्रशासनाची संबंध नाही असे लोक या मोर्चात सहभागी होते.या मोर्चात काही बांगलादेशी घुसखोर (रोहिंगे) देखील सहभागी होते,या बाबी थेट कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याबद्दल आता चर्चेला उधाण आले आहे...

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. " दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, सरकारला निवडणुका घ्यायची भीती वाटत आहे" असा आरोपही राहुल बोंद्रे यांनी या मोर्चात केला. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांची देखील डफडे बजाव आंदोलनात उपस्थिती होती. मात्र या मोर्चादरम्यान ज्यांचा शहराशी संबंधच नाही असेही लोक आंदोलनात दिसल्याने "ते" लोक भाडोत्री होते काय? त्यांना कुणी मोर्चात आणले? अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे..अर्थात ती दृश्य थेट कॅमेऱ्यात कैद असल्याने तशी चर्चा होणे स्वाभाविक आहे...