खामगांव विधानसभेसाठी काँग्रेस पार्टी ओबीसी उमेदवाराच्या शोधात? मंगेश भारसाकळे'चं नावही चर्चेत...
१९७८ च्या विधानसभेच्या लढतीची पुनरवृत्ती होऊ शकते.
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार यासाठी तयारीला लागले आहेत. खामगांव मतदार संघावर गेल्या १० वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत आहे. या मतदार संघातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना लोकसभेत विद्यमान आमदार फुंडकर यांच्याकडून २० हजाराच्या वर लीड देऊन दिला. त्यामुळे फुंडकर यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. खामगाव मतदार संघ ओबीसी बहुल मतदार संघ असून त्यातही ओबीसी मतदार जवळपास ७० हजाराच्या आसपास आहे. प्रत्येक बूथवर ओबीसी समाजाचे ४०-४२% मतदान होते, त्यातील ३८-४०% टक्के मतदान एकट्या विद्यमान आमदाराला होते. या मतदार संघात ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीचा मतदार समजल्या जातो. एकतर्फी ओबीसी समाजाची मते , इतर ओबीसी व हिंदी सायडर ही भाजपा'ची मजबूत वोट बँक विद्यमान आमदाराच्या पाठीमागे आहे.गेली अनेक वर्ष अल्पसंख्यांक उमेदवार देवून काँग्रेस पासून ओबीसी समाज दुरावाला आहे. नुकताच काँग्रेस पक्षाने खामगाव सह महाराष्ट्र मध्ये एजन्सी मार्फत सर्वे केला आहे. खामगांव मतदार संघात खास करून कुणबी अथवा ओबीसी उमेदवार दिल्यास तो उमेदवार हमखास विजय होवू शकतो, असा निष्कर्ष सर्वेतून काढण्यात आला आहे.
मंगेश भारसाकळेंचे नाव आघाडीवर...
सर्वेचा आधार घेवून काँग्रेस कुणबी अथवा इतर ओबीसी उमेदवार शोधात आहे. कुणबी समाजाचे युवा नेते मंगेश भारसाकळे यांची कुणबी समाजावर चांगली पकड आहे. भारसाकळे यांनी कुणबी युवा मंचा'च्या माध्यमातून समाजात चांगली पकड निर्माण केली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पहिले उपोषण कुणबी समाजच्या मागणीसाठी त्यांनी केले होते. कुणबी समाजातून त्यांना खूप प्रतिसाद मिळाला होता.मार्च २०२२ मध्ये शेगाव येथे छ्तीसगड येथील माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थिती मध्ये भव्य ओबीसी संमेलन घेवून समाजातील आपली पकडं सिद्ध केली आहे.ओबीसी उमेदवार मंगेश भारसाकळे यांना उमेदवारी भेटल्यास खामगाव मध्ये १९७८ सारखी लढत पाहायला मिळू शकते. काँग्रेस पक्षातर्फे ओबीसी समाजाचे मंगेश भारसाकळे यांना संधी भेटल्यास १९७८ ची पुनरवृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगेश भारसाकळे सध्या किसान काँग्रेस चे विदर्भ अध्यक्ष असून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ,माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अत्यंत जवळचे आहेत. खामगाव मधून काँग्रेस कडून संधी भेटल्यास ओबीसी समाजाचे ४० हजार एकतर्फी मतामध्ये मोठे विभाजन होवून २० हजाराच्या वर मतदान मंगेश भारसाकळे यांना होवू शकते. मंगेश भारसाकळे यांना संधी भेटल्यास खामगांव मतदार संघात ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.