काँग्रेसने शहराचा विकास न स्वतःचा विकास केला,कामे न करताच काढली बिले! भाजप नेते सतीश गुप्त यांचा आरोप! म्हणाले, आमदार श्वेताताईंमुळे चिखली शहराचा चेहरामोहरा बदलतोय!

चिखलीत २६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न..!

 
Mmmm
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली विधानसभा मतदारसंघात आ. श्वेताताई महाले यांनी विकासाचा झंझावात सुरू केला आहे. सोबतच चिखली शहरासाठी भरभरून निधी खेचून आणत विकासकामे सुरू केली आहेत. त्यांच्या विकासाच्या व दूरदृष्टीमुळेच आज चिखली शहराचा चेहरामोहरा बदलत आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश ‍ गुप्त यांनी  केले.

चिखली शहरात विविध योजनेअंतर्गत २६ कोटी रुपये किमतीच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा 'आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते काल,१५ फेब्रुवारीला पार पडला.  यावेळी अध्यक्षस्थानी सतीश गुप्त यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गुप्त म्हणाले, नगरपालिकेवर आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती. परंतु काँग्रेसने शहराचा विकास न करता स्वतःचाच विकास केला. काँग्रेसच्या काळात नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. कामे न करताच बिले काढली. त्यामुळे शहराचा विकास खुंटला. मागील पाच वर्षांत तत्कालिन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून निधी दिला. मागील नगराध्यक्षांच्या भ्रष्ट कारभाराने कळस गाठला. भाजपमध्ये भ्रष्ट कारभाराला थारा नसल्याने भ्रष्टाचारी लोकांची पक्षातून हकालपट्टी केली. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आ. श्वेताताई महाले यांनी विकासाची दूरदृष्टी ठेवत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करवून घेतला. विशिष्ट नागरी व सेवा सुविधा या योजनेअंतर्गत हद्दवाढ झालेल्या भागामध्ये  जवळपास २४.४४ कोटी रुपये विशिष्ट नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत १६.४२ कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान योजनेअंतर्गत २५.५८ कोटी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १२६८ कोटी, विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत ११.९ कोटी असा जवळपास ९१ कोटी रुपयांचा निधी आमदार श्वेताताई महाले यांनी खेचून आणला.

  कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सुरेशआप्पा खबुतरे, माजी नगराध्यक्षा विमलताई देव्हडे, ज्येष्ठ नेते रामकृष्ण शेटे, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, शहराध्यक्ष भाजपा पंडितराव देशमुख,  अनिसभाई, शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, भाजपा तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, अंकुशराव पाटील, वीरेंद्र वानखेडे, राजेंद्र व्यास, शिवराज पाटील, गोविंद देवडे, संतोष काळे, सागर पुरोहित, विजय नकवाल, सुरेंद्र पांडे, शैलेश बाहेती, गोपाल तुपकर, सलीम परवेज, श्याम वाकतकर, संजय आतार, सुभाष आप्पा झगडे यांच्यासह प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
    

शहराला नवीन ओळख द्यायची आहे : आमदार श्वेताताई महाले

यावेळी बोलताना आ. श्वेताताई म्हणाले, चिखली शहर हे बुलढाणा जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, मोठी बाजारपेठ असलेले शहर आहे. या ठिकाणाहून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या शहरात येणाऱ्या, जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चिखली येथील एमआयडीसी आता चांगल्याप्रकारे विकसित होत असून या ठिकाणी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येत आहे. एमआयडीसीला मोठमोठे उद्योग आणून या ठिकाणची बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. खामगाव जालना रेल्वेमार्ग आणण्यासाठीसुद्धा मी प्रयत्नशील असून खामगाव ते जालना रेल्वेमार्ग झाल्यास चिखली तालुक्यातीलच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील मोठी बेरोजगारी संपुष्टात येईल. परंतु चिखली शहर मागील सत्ताधाऱ्यांमुळे अतिशय मागास राहिलेले आहे. चिखली शहराला स्वतःची अशी ओळख निर्माण करणे ही माझे आद्य कर्तव्य असून शहराला नवीन ओळख देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीदेखील आ. महाले यांनी दिली.

या कामांचे केले भूमिपूजन...!

जाफराबाद रोडपासून ते बोधेकर लेआऊट व पुढे न.प. हद्दीपर्यंत (भानखेड) रस्ता काँक्रिटीकरण, दुतर्फा नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक पदपथाच्या कामावर ५,५६,६१,३३६ रुपये खर्च होणार आहे. तसेच चिखली शहर सर्व्हे नंबर १२३, १२४ लढ्ढा ले-आऊटपासून ते सावजी कॉम्प्लेक्सपर्यंत रस्ता कॉक्रिटिंग, दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यासाठी ३,३८,७७,२५० रुपये खर्च केला जाणार आहे.