आमदार धिरज लिंगाडेंवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी!

 

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अमरावती विभागाच्या प्रभारी पदावर यापुर्वी प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर आता या विभागाच्या सहप्रभारी पदी पदवीधर मतदार संघाचे आमदार धिरज लिंगाडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार प्रदेशचे संघटन व प्रशासनाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी केली आहे. 

धिरज लिंगाडे यांनी शिवसेना ठाकरे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांना अमरावती पदवीधर मतदार संघाची उमेदवारी काँग्रेसने दिली. त्यानंतर आता त्यांना कॉंग्रेसने संघटनेतही स्थान दिले असून, त्यांची नियुक्ती ही अमरावती विभागाच्या कॉंग्रेस सहप्रभारी पदी करण्यात आली आहे.