आ. संजय रायमुलकरांच जरा अतीच झालं! टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला दिल्या शिव्या; कारणही अजबच.. आमदारपुत्राची गाडी टोलनाक्यावरून फ्री सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला कर्तव्यदक्ष मॅनेजरने ठोठावला होता दंड..!

 
sanjay raymulkar
मेहकर (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरचे "हिंदुत्वप्रिय" आमदार संजय रायमुलकर एका नव्या वादात अडकलेत. समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. विशेष म्हणजे आपण केलं ते योग्यच केलं असही आमदार रायमूलकरांच म्हणन आहे. मात्र अस असल तरी लोकांनी आमदारांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केलाय. आमदार रायमुलकरांच हे जरा अतीच झालं अशा प्रतिक्रिया सामान्यांनमधून उमटत आहेत.
 

 काही दिवसांपूर्वी आमदार रायमुलकर यांच्या मुलाची गाडी समृध्दी महामार्गावरील टोलनाक्यावरून फ्री सोडण्यात आली होती. ज्या कर्मचाऱ्याने ही गाडी फ्री सोडली त्या कर्मचाऱ्यावर टोल नाका मॅनेजरने दंडात्मक कारवाई केली होती, वरिष्ठांनी त्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी देखील केलं होत. ही बाब जेव्हा आमदार रायमुलकर यांना समजली तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्या टोल नाक्यावरील मॅनेजरला शिव्यांची लाखोली वाहिली..तोडक्या मोडक्या हिंदीत घाणेरड्या शिव्या देतानाच आमदार रायमुलकर यांचा व्हिडिओ वादाचा ठरतोय. विशेष म्हणजे आमदार रायमुलकर त्या मॅनेजरचे काहीही एकूण न घेता घाण घाण शिव्यांची लाखोली त्या कर्तव्यदक्ष मॅनेजरला वाहतात. तुला मारीन, टोल नाका फ्री करील, उचलून घेऊन जाईल अशा धमक्याही रायमुलकरांनी टोल नाक्यावरील मॅनेजरला दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे. एवढं होऊनही आमदार रायमुलकर स्वतःच्या कृत्याचे समर्थन करीत आहेत.
    
आमदाराचा मुलगा आहे म्हणून काय झालं? त्याला वेगळे नियम आहेत काय..

 दरम्यान सोशलमीडियावर नेटकरी, सामान्य नागरिक  मात्र टोलनाक्यावरील त्या मॅनेजर चे कौतुक करतांना दिसत आहे. आमदारांना टोल माफ असला तरी आमदारांच्या कुटुंबीयांना मात्र तो नियम लागू नाही. मात्र तरीही काही आमदारपुत्र अरेरावी करून टोलनाक्यावरून गाड्या सुसाट नेतात. त्यामुळे आमदार पुत्राला टोल माफ करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिक्षा ठोठावणाऱ्या मॅनेजरचे सर्वत्र कौतुक होतंय.