आ. संजय गायकवाडांनी सांगितले रणजित पाटलांच्या पराभवाचे कारण! म्हणाले, प्रचाराच्या वेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही, नियोजनाचा अभाव होता! आम्हाला विश्वासात घेतले असते तर..
राज्यातल्या पाचपैकी दोन जागांवर आमचे उमेदवार विजयी झाल्याचे संजय गायकवाड म्हणाले. नाशिकचा उमेदवार भाजप पुरस्कृत होता असेही आ.गायकवाड म्हणाले. जुनी पेन्शन योजना व अनेक वर्षांपासून तेच तेच आमदार असल्याने अँटी इन्कमबसी हा फॅक्टर भाजप उमेदवाराच्या पराभवाचे कारण ठरल्याचे आ.गायकवाड म्हणाले. आमच्या उमेदवाराने आम्हाला व खासदार जाधव यांनाही विश्वासात घेतले नाही. आम्ही प्रचारासाठी दौरे केले नाहीत व आम्हाला दौरे करण्यासाठी बोलावले देखील नाही. मतदार याद्या आम्हाला ४ दिवस आधी मिळाल्या. आम्हाला विश्वासात घेतले असते तर निकालाचे चित्र वेगळे असते असे आ.गायकवाड म्हणाले. आमच्या उमेदवाराच्या प्रचारात नियोजनाचा अभाव होता असेही ते म्हणाले.
आता बुलडाण्याला दोन दोन आमदार..
धिरज लिंगाडे माझे मित्र आहेत. त्यांच्या विजयाचा आनंद आहेच. दोन दिवस आधीच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता बुलडाणा शहराला दोन दोन आमदार असल्याचा आनंद आहे असे आ.गायकवाड म्हणाले.