आ. धीरज लिंगाडे यांचा शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयी सत्कार

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अमरावती पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांचा प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके, राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी ७ फेब्रुवारी रोजी राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयी सत्कार केला. 

धीरज लिंगाडे यांनी अमरावती पदवीधर मतदारसंघातून भरघोस मतांनी विजय मिळवला. बुलडाणा येथून पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारे ते पहिलेच आमदार ठरले आहेत. दरम्यान मंगळवारी राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आ. धीरज लिंगाडे यांनी राजर्षी शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

यावेळी पत्रकार संदीप चव्हाण, अशोक खोंडे, श्रीकांत जाधव, कुणाल कुलकर्णी, पृथ्वी राजपूत, धनंजय बाहेकर, तानाजी पैठणे, रवींद्र राठोड, अशोक काळे, समाधान राऊत, प्रमोद माळी, राजर्षी शाहू पतसंस्थेचे सरव्यवस्थापक नितीन उबाळे, भागवत गव्हाणे, योगेश महाजन, दत्तू चवंड, बाळू वाघ यांच्यासह ग्रामसेवक संघटना, राजर्षी शाहू फाउंडेशनचे पदाधिकारी व राजर्षी शाहू पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.