आ. गायकवाडांच्या होमग्राउंड वर आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा! अंबादास दानवे करणार मार्गदर्शन! आ. गायकवाड समर्थकांचा आधीचा इतिहास पाहता पोलीस अलर्ट मोडवर

 
aambadas
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आ. संजय गायकवाड यांचे   होमग्राउंड असलेल्या बुलडाण्यात आज, १६ सप्टेंबर रोजी शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. अर्थात हा मेळावा आ.गायकवाड यांच्या शिवसेनेचा नसून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आहे. फायरब्रँड नेते अंबादास दानवे या मेळाव्याला संबोधित करणार असून ते शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांचा इतिहास पाहता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

danve

याआधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठाकरे गटाच्या मेळाव्यात आ. गायकवाड समर्थकांनी धुडघुस घातला होता. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रे या नेत्यांना धक्काबुक्की करून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर विरोधात बोलणाऱ्यांना चुन चुन के मारेंगे असे म्हणत आ. गायकवाडांनी या प्रकाराचे समर्थन केले होते.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा संपूर्ण जिल्ह्याच्या मेळावा आज बुलडाण्यात होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बळ तैनात केले आहे. कार्यक्रमात कोण काय बोलणार आणि त्यानंतर आ.गायकवाड काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.