कॉफी विथ रविकांत तुपकर..! वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांसह व्यापारी, उद्योजकांशी साधनार संवाद! उद्या सकाळी अनोखा कार्यक्रम!

 
गधदज
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी, कष्टकरी , तरुण सर्वसामान्य जनता वंचित घटकाचे अपक्ष उमेदवार असलेले रविकांत तुपकर यांचा प्रचार सध्या जिल्हाभर दणक्यात सुरू आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांसोबत रविकांत तुपकर थेट संवाद साधत आहे. याच माध्यमातून बुलढाणा शहरात उद्या,१६ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये कॉफी विथ रविकांत तुपकर असा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  
 बुलडाणा शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवर तसेच व्यापारी उद्योजकांशी रविकांत तुपकर संवाद साधून चर्चा करणार आहेत. गावगाड्यातील सर्वसामान्य जनता रविकांत तूपकरांसाठी स्वतःचा पैसा, श्रम खर्च करून जोरदार प्रचार करत आहेत. समाजात प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून त्याच्याशी थेट संवाद साधण्याची मोहीम रविकांत तुपकरांनी हाती घेतली आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत उद्या, १६ एप्रिल रोजी बुलढाणा शहरात एक आगळा वेगळा कार्यक्रम देखील होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, केमिस्ट, फार्मासिस्ट, पॅथॉलॉजिस्ट तसेच शहरातील सर्व छोटे-मोठे उद्योजक, व्यापारी यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी व त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कॉफी विथ रविकांत तुपकर हा कार्यक्रम बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मलकापूर रोड येथे सकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. रविकांत तुपकर मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शहरातील सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर मंडळी तसेच उद्योजक व व्यापारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन रविकांत तुपकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात रविकांत तुपकर यांच्या नावाची हवा सध्या जोरात आहे. त्यातच हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.