चिखलीत उद्या मुख्यमंत्र्यांची सभा! खा. प्रतापराव जाधवांकडून सभास्थळाची पाहणी! हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 
फह
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या,१३ जानेवारीला चिखलीत येणार आहे. चिखली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आज,१२ जानेवारीला खा. प्रतापराव जाधव यांनी सभास्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला.

ॲड

ॲड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या मिशन ४८ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शिवसंकल्प अभियानासाठी उद्या चिखलीत येणार आहेत. पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज खा. प्रतापराव जाधव यांनी सभास्थळाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांचे , कष्टकऱ्यांचे नाथ असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खा. जाधव यांनी केले आहे.