चिखली पंचायत समितीत नागरिकांना नुसता वैताग! दीड वर्षात झाले ७ गटविकास अधिकारी; एकही कामाचा नाही; सत्ताधारी शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वात डफडे बजाओ आंदोलन

 
gajanan more
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या दीड वर्षात चिखली पंचायत समितीने ७ प्रभारी बिडीओ बघितले. मात्र प्रशासनाने अजूनही कायमस्वरूपी बिडीओ दिला नाही. ज्यांच्याकडे प्रभार आहे ते कार्यालयात दिसत नाहीत, नागरिकांचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारींचे निवारण नाही, त्याचे अहवाल ५ - ६ महिन्यांपासून धूळखात पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डफडे बजाओ आंदोलन केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजाननसिंह मोरे यांच्या नेतृत्वात आज,२८ मार्चच्या दुपारी झालेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले.
 

 कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर कुणाचे नियंत्रण नाही. अनेक कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नाही, जे येतात ते दुपारी लवकर निघून जातात. नुसता मनमानी कारभार सुरू आहे. प्रभारी बिडीओ फोन उचलत नाहीत, सगळा नियोजनशून्य कारभार आहे. शासनाचा फुकटचा पगार हे अधिकारी लाटतात असा आरोप तालुकाप्रमुख गजाननसिंह मोरे यांनी यावेळी केला. त्यामुळे प्रशासनाला इशारा देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे मोरे यावेळी म्हणाले.  शिवसेना नेते अर्जुन नेमाडे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शहरप्रमुख विलास घोलप, उपतालुका प्रमुख रवी भगत, उपतालुका प्रमुख पंजाबराव जावळे,  मंगेश बाहेकर, जितू पुरोहित, गजानन शेळके, विठ्ठल जगदाळे, अनिल जाधव, परमेश्वर शेळके, भीमराव शेळके या आंदोलनात सहभागी झाले होते.