चिखली विधानसभा मतदारसंघ पंढरी तर आमदार श्वेताताई वारकरी! हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांचे गौरवोद्गार! मंगरूळ नवघरे , इसोली सर्कल मध्ये आ. श्वेताताईंच्या हस्ते ९ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

आ. श्वेताताई म्हणाल्या,विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय..

 
Ghuud
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार श्वेताताईंनी चिखली विधानसभा मतदारसंघाची धुरा हाती घेतल्यापासून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत  आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या अनेक गावांच्या पायाभूत सुविधांसाठी आ. श्वेताताईंनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. मतदारसंघात जेवढी कामे आ. श्वेताताईंच्या तीन वर्षांच्या काळात झाली तेवढी आधीच्या १० वर्षात झाली नाहीत, त्यातही श्वेताताईंच्या आमदारकीच्या प्रारंभीच्या २ वर्षांचा कार्यकाळ हा कोरोनात गेला. आ. श्वेताताईंसाठी चिखली मतदारसंघ हा पंढरी आहे, मतदारसंघातील प्रत्येक नागरिक विठ्ठल तर भगिनी रखुमाई आहे, आणि आमदार श्वेताताई या मतदारसंघाच्या वारकरी आहेत. जनतारुपी विठ्ठलाच्या सेवेसाठी त्या पायाला भोवरा लावून फिरतात. ज्याप्रमाणे विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर वारकऱ्यांचा शीण निघून जातो त्याचप्रमाणे जनतेची झालेली कामे पाहून आ. श्वेताताईंना विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे समाधान होते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ. प प्रकाशबुवा जवंजाळ यांनी केले. चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथे आ. श्वेताताईंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले यावेळी ते बोलत होते.

Bai

  काल, २० फेब्रुवारीला मंगरूळ नवघरे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे २ कोटी ९१ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पार पडले. मंगरूळ नवघरे चौफुली येथील पुलाच्या बांधकामासाठी  १ कोटी ५० लक्ष रुपयांचे भूमिपूजन व अमडापूर लव्हाळा दुसरबीड  या रस्ता सुधारणेसाठी ६ कोटी १० लक्ष रुपयांच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी पार पडले. मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार लोककल्याणकारी योजना राबविणारे शासन आहे. महाविकास आघाडीच्या काळातील विकासाचा बॅकलॉग आता भरून निघत आहे असे प्रतिपादन यावेळी आ. श्वेताताईंनी केले.

   यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष  कृष्णकुमार सपकाळ, वसंतराव गाडेकर, विजय पाटील अंभोरे, बंडू अंभोरे, संतोष काळे,भारत म्हळसने, गणेशराव अंभोरे पाटील,विजय पाटील,मदन पाटील,  विनोद सिताफळे , राजेश अंभोरे ,उध्दव महाराज  जवंजाळ, कैलाश खरात, नंदू गुंजकर,  बद्रीनाथ वाकडे, डॉ दिलीप अंभोरे, संजय खंडागळे, संजय घरत, वसंतराव अंभोरे, पंजाबराव नवघरे, विजय जाधव, जगन लहाने, गजानन अंभोरे, भरत सोळंकी, पंकज लोहार यांच्यासह आयोजक मंगरूळ नवघरेच्या सरपंच सौ. नलिनी ताई जाधव, भाजपा,शिवसेना, रिपाई आठवले गट, रासप, शिवसंग्राम, प्रहार चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.