मुख्यमंत्री साहेब, ही काय महायुतीची प्रचारसभा आहे काय?शासन आपल्या दारी कार्यक्रम सरकारचा की, शिवसेना, भाजप , राष्ट्रवादी काँग्रेसचा?

 बुलडाण्याच्या रस्त्यांवर लागलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे झेंडे काय सांगतात..

 
dkfsdkfj

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखेर मुख्यमंत्र्याच्या बुलडाणा दौऱ्याचा मुहूर्त ठरलाय.. उद्या म्हणजेच ३ सप्टेंबरला बुलडाण्यात "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम होणार आहे, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी बुलडाण्यात झाली आहे, रस्त्यांवर जागोजागी फ्लेक्स लागले आहेत. मात्र बुलडाणा शहरातील रस्त्यांवर लागलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या झेंड्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शासनाचा की सत्तेत सहभागी असणाऱ्या पक्षांचा? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडतो आहे...

शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात येत आहे, कारण हा कार्यक्रम शासनाचा आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रशासनाचा भाग म्हणून उपस्थित राहणार आहेत, या दौऱ्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. असे असताना बुलडाणा शहराच्या रस्त्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे झेंडे कुणी लावले? तसे करण्याची काय गरज होती? ही काय महायुतीची प्रचारसभा आहे काय असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.