मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलडाण्यात! पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक, कार्यकर्ता मेळाव्यालाही संबोधित करणार!

डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यापारी, फार्मसीस्टशीही साधणार संवाद! खा. प्रतापराव जाधवांच्या विजयासाठी मायक्रोप्लॅनिंग वर भर
 
हजक
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज १४ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आज दिवसभर ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. अजिंठा रोडवरील ओंकार लॉनवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी धाड नाक्यावरील ओंकार लॉनवर महायुतीच्या कार्यकर्ता मिळाला मुख्यमंत्री शिंदे संबोधित करणार आहेत. दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गाशी मुख्यमंत्री शिंदे संवाद साधणार आहेत. मलकापूर रोडवरील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
डॉक्टर, वकील, इंजिनियर, फार्मसीस्ट, व्यापारी यांच्याशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.