माळी महासंघाच्या वतीने बुलडाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खास पगडी घालून सन्मान! खा.प्रतापराव जाधव म्हणाले, तीनदा संसदेत पाठवण्यात माळी समाजाचे मोठे योगदान..

 
बुलडाणा
बुलडाणा: बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली. १४ एप्रिलला बुलडाण्यात झालेला महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा यावर कळस ठरला. प्रतापरावांना मत म्हणजे मोदींना मत, प्रतापरावांची आता हॅट्रिक झाली आता यंदा ते चौकात मारणारच असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी खा.जाधव यांच्या विजयाचे एकप्रकारे भाकीतच वर्तवले. या मेळाव्यात खा.जाधव यांच्या समर्थनार्थ विविध संघटनांनी, समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. शिवाय माळी महासंघाच्या वतीने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास पगडी घालून सन्मान करण्यात आला.
  Advt
Advt.👆
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ १४ एप्रिल रोजी धाड नाक्यावरील ओंकार लॉन मध्ये महायुतीचा पदाधिकारी मेळावा झाला. या मेळाव्यात माळी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास पगडी घालून सन्मान केला. यावेळी माळी महासंघाचे बाळासाहेब गिऱ्हे, सुरेश चौधरी, आशिष लहासे, वैभव इंगळे, दादा हुडेकर, दत्ता खरात, आशाताई झोरे यांच्यासह माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. "आपल्याला आमदार आणि तीनदा खासदार करण्यात माळी समाजाचा मोठा वाटा आहे. प्रत्येक निवडणुकीत समाजाने माळी आपल्याला भरघोस मतदान केले आहे. माळी समाजाचे आपल्यावरील उपकार कधीही विसरता येणार नाही असे खा.प्रतापराव जाधव कार्यक्रमानंतर माळी समाज बांधवांशी संवाद साधतांना म्हणाले.