BREAKING काँग्रेस जिल्हाध्यक्षासह ११ जणांवर गुन्हे दाखल! आचारसंहितेत आंदोलन केल्यामुळे कारवाई

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसचे बँक खाते गोठविणे व कोट्यवधींचा दंड ठोठावन्याच्या कारवाई विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.यामुळे काँग्रेस सह आघाडीत खळबळ उडाली आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली . सोबतच काँग्रेस पक्षाला १८०० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी काल रविवारी ३१ मार्चला बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली होती. बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत कारवाई केली. निवडणूक आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह ११ जणांवर कलम १८८ व १३५नुसार गुन्हे दाखल केले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.