बुलडाणा लाइव्ह इम्पॅक्ट! सकाळी बातमी छापली अन् दुपारी निवडणूक आयोगाने मशाल गायब केली! चिखली शहराजवळच्या कमानीवर होती पेटती मशाल..

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली बुलडाणा रस्त्यावरील सवणा फाट्यावर असलेल्या कमानीवर दोन्ही बाजूला पेटती मशाल असल्याचे वृत्त आज,१३ एप्रिलच्या सकाळी बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केले होते. आदर्श आचारसंहितेचे कारण समोर करून बुलडाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील मावळ्यांच्या हातातील तुताऱ्या झाकणाऱ्या निवडणूक आयोगाच्या नजरेतून ही बाब सुटलीच कशी असा सवाल बातमीत उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान बुलडाणा लाइव्ह ने वृत्त प्रकाशित करताच "त्या" कमानीवर लावलेल्या पेटत्या मशाली निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतल्या आहेत.