BULDANA LIVE UPDATE मोठी बातमी! अंचरवाडीचे समाधान परिहार झाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक! भाजपकडे १ तर महाविकास आघाडीकडे ६ जागा

 
अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत  महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलने चांगलीच आघाडी घेतली आहे. पहिली जागा भाजपला मिळाली मात्र त्यानंतर आतापर्यंत हाती आलेल्या सर्व जागांचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने गेले आहेत.
 

 हमाल मापारी मतदारसंघातून सहकार परिवर्तन पॅनलचे गजानन पवार विजयी झाले. व्यापारी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलचे जय बोंद्रे, नीरज चौधरी तर ग्रामपंचायत मतदारसंघातून मनोज लाहुडकर, राम खेडेकर, समाधान परिहार आणि  संजय गवई विजयी झाले आहेत.अंचरवाडी चे सुपुत्र समाधान सुखदेव परिहार कृषी उत्पन्न  बाजार समितीचे संचालक झाले आहेत.

 शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा महाविकास आघाडीच्या पारड्यात आणखी २ जागा आल्या. सोसायटी मतदारसंघातून डॉ.संतोष वानखेडे आणि रामभाऊ जाधव विजयी झाल्याने महाविकास आघाडीचा आकडा ८ वर पोहचला आहे.