BULDANA LIVE EXCLUSIVE हर्षवर्धन सपकाळ म्हणतात ते "मैत्रीपूर्ण लढत" म्हणजे काय रे भाऊ? त्याचे परिणाम काय होतात...

 
Maitripurn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे सोशल मीडिया वरील प्रेम जगजाहीर आहे. ते जनता, चाहते व प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी यांच्याशी गंभीर विषयावर थेट संवाद साधण्याचे टाळतात. काल संडेच्या मुहूर्तावर देखील या दिग्गज नेत्याने 'एक्स' वर पोस्ट करून महाविकासआघाडीत खळबळ उडवून दिली. त्यांनी राज्यात मैत्रीपूर्ण लढत, बुलडाण्यात काय? असा मोठा प्रश्न उपस्थित केला.यामुळे लोकसभेची धामधूम रंगात येत असतानाच नवीन मतदार, आताच्या पिढीतील (सर्वपक्षीय बरं का) राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते (काही अर्धवट नेतेही) बुचकळ्यात पडले! कोणाला काही विचारावं तर 'मले नाय ठावूक' अशीच उत्तरे मिळालीत. बरं ज्यांना ठाऊक हाय त्यांना विचारण्याची सोय अन हिम्मत नाही अशी नाजूक अडचण! यामुळे मैत्रीपूर्ण लढत या शब्दाने लै जणांच डोकं खाल्ल्याचं दिसून आलं. मग डोकं जास्तच दुखू लागल्यान अन त्यात 'संडे इज हॉलिडे' असल्याने अनेकांनी 'लाल औषध' दोन मात्रा जास्तच घेतल्याची तरंगदार चर्चा सुरू हाय.
 "बुलडाणा लाइव्ह'
      म्हणते,'मै हुं ना....
  होय, वाचकांच्या अन राजकारण्यांच्याही सर्व प्रश्नांची उत्तरे बुलडाणा लाइव्ह कडे नक्कीच हाय! तर, एकाच घरातील २ जुळे भाऊ, भाऊ बहीण लैच हुशार, म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे मेरिट च जणू! जुळे असल्याने दोघबी एकाच वर्गात राहणार हे उघड. मग वर्गात दोन पैकी एक पहिला येणार..मग बंटी दादा सारखी हुशार आई(घरात तर आईच किंवा बाईच हुशार असती ना बाबानो) मग दोघांना मैत्रीपूर्ण लढत चा सल्ला देते.आपसात वाद नको, कुणिबी पैला आला तर घरातच मान पान राहील ना? असा सल्ला ती देते. आता दुसरं उदाहरण म्हणजे एखादा मोठा वाडा असला अन् भावांच पटते पण त्यांच्या बायकांचे पटत नाही. मग घरातला 'दादा' म्हणतो, वाडा अर्धा अर्धा वाटून घेऊ, किचन वेगळं पण गुपचूप गुपचूप वेगळं रहायचं,बाहेर भणक लागू द्यायची नाय, बाहेर हम साथ साथ है अन अंदर हम अलग अलग है! तर ही वाटणी झाली मैत्रीपूर्ण ! 
   
आता राजकीय उदाहरण पाहू म्हणजे एखाद्या जागेवरून (उदाहरणार्थ सांगली किंवा बुलडाणा) दोन किंवा तीन पक्षाचे पटलच नाही तर मग दोघानी एकमेका विरुद्ध लढायचं, वर आघाडी कायम राहील अन खाली दुष्मनी! मग दोघे खापी गेले आणि दुष्मन निवडून आला तरी बी चालेल, पण मैत्रीपूर्ण लढत द्यायचीच.. म्हणजे नवरा मेला तर चालेल, पण सवत रंडकी झालीच पायजेल हा बाणा! तर अलीकडे तर नाही पण मागील काळात एकदोन अश्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. त्याचे परिणाम सवत रंडकी होण्यातच झाले. बुलडाण्यात १९५७ पासून आजवर असे झालेले नाय, बरका.....