Amazon Ad

बुलडाणा लाइव्ह चे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा! देऊळगाव घुबे नगरीत वृक्षारोपण आणि...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डिजिटल मीडियात क्रांतीकारी पाऊल ठरलेल्या "बुलडाणा लाइव्ह" चे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार कृष्णा सपकाळ यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथेही कृष्णा सपकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण, फळवाटप आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावपरिसरातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळी यावेळी उपस्थित होती.
जिल्हाभरात साडेसहा लाख वाचकसंख्येचा विक्रम रचलेल्या "बुलडाणा लाइव्ह" ने आपली वेगळी ओळख जपली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना खत बी बियाणांचे सहाय्य, जळगाव जामोद पूरग्रस्तांसाठी जिल्हाभरातून मदत संकलन, रक्तदान यासह विविध सामाजिक उपक्रम बुलडाणा लाइव्ह ने राबविले आहेत. जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सत्यनिष्ट पत्रकारितेतून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
त्यांचा वाढदिवस देखील सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली तालुका प्रतिनिधी ऋषि भोपळे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण आणि फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देऊळगाव घुबे येथील प्राथमिक शाळेत संपन्न झालेल्या कार्यक्रमात चिमूकल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनही मिळाले. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त व स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक झाड जरी लावले तरी ती देश सेवा ठरेल असे प्रतिपादन याप्रसंगी बोलतांना शिक्षकांनी केले. यावेळी शिक्षक श्री वायाळ, वैभव घुबे, अभिजित घुबे, पवन सरोदे, दिपक सरोदे,विष्णु पाटील घुबे युवा मंच चे अध्यक्ष ,प्रसन्न घुबे आदींची उपस्थिती होती.