BULDANA LIVE BREAKING अखेर विजयराज शिंदेंची तलवार म्यान! आ. श्वेताताईंची मध्यस्थी यशस्वी

 
तशजक
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उमेदवारी अर्ज भरून महायुतीत खळबळ उडवून देणाऱ्या विजयराज शिंदे यांनी अखेर आपली तलवार मान्य केली आहे. आज,८ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षहितासाठी आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे  यावेळी उपस्थित होते. परवा म्हणजेच ६ एप्रिलच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. श्वेताताई महाले यांना विजयराज शिंदेंशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते, शिवाय काल ७ एप्रिलला नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देखील देखील आ. श्वेताताई उपस्थित होत्या. एकंदरीत पक्षहितासाठी आ. श्वेताताई महाले यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवून भारताला सर्वोच्च स्थानी पोहचवणे आणि त्यासाठी अबकी पार ४०० पार हेच आमचे लक्ष आहे त्यामुळे आपण अर्ज मागे घेत आहोत." असे विजयराज शिंदे यावेळी म्हणाले.