नानांच्या वक्तव्यावर बुलडाणा काँग्रेसचे पांघरूण; समर्थनार्थ निदर्शने
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी निदर्शनांचे नेतृत्त्व केले. त्यानंतर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की नाना पटोले मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबद्दल बोलत होते. नाना म्हणाले, की गुंड मोदीला आपण शिव्या देऊ शकतो, मारू शकतो... मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत त्याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील भाजपाचे नेते जाणीवपूर्वक गावगुंड मोदीबाबत केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधानांचा संबंध जोडून पंतप्रधान पदाचा अपमान करत आहेत. लोकांची दिशाभूल करणे दखलपात्र गुन्हा असून, भाजपा नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी दीपक रिंढे, शैलेश खेडेकर, तुळशीराम नाईक, राजेश पोलाखरे, चित्रांगण खंडारे, विनोद बेंडवाल, महेश ढगे, गौरव नाईक, संतोष पाटील, प्रभाकर इंगळे, गोपालसिंग राजपूत, मोईन काझी आदी पदाधिकारी उपस्थित होते.