BREAKING'मातोश्री' चं ठरलंय! बुलडाणा मतदारसंघ उबाठाच लढणार ! विजय मिळवून गध्दाराना गाडणारच!!उद्धव ठाकरे लवकरच जिल्ह्यात

 
Rt
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघा संदर्भात मुंबई येथील 'मातोश्री' येथे शिवसेनेची महत्वपूर्ण व निर्णायक बैठक आज गुरुवारच्या मुहूर्तावर पार पडली. या बैठकीत 'कोणत्याही परिस्थितीत बुलडाणा लढायचे आणि जिंकायचे' असा निर्धार करण्यात आला. दरम्यान लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलडाण्यात मुक्कामी येणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
 आज दुपारी ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' येथे केवळ बुलडाण्यावर स्वतंत्र बैठक घेण्यात आली. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजताच्या सुमारास सुरू झालेली बैठक अडीचएक तास चालली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला बुलडाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय जिल्ह्यातील उप जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख व प्रमुख पदाधिकारी हजर होते. दरम्यान यावेळी ठाकरे यांनी पक्षाचा मतदारसंघातील संघटनात्मक आढावा घेतला आणि थेट निवडणुक तयारीला हात घातला. कोणत्याही परिस्थितीत बुलडाण्यातून लढायचे, विजयी होऊन गध्दाराना गाडायचे असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्याची मागणी रेटली.
 
   दरम्यान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेते लवकरच बुलडाण्यात मुक्कामी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या २१ व २२ फेब्रुवारीला ते बुलडाण्याच्या दौऱ्यावर येणार आहे. पहिल्या सत्रातील बैठकीनंतर या दौऱ्याचे विधानसभा निहाय नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.