BREAKING केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी पदभार स्वीकारताच केली मोठी घोषणा..

 
Jxmx
नवी दिल्ली (लाईव्ह न्यूज नेटवर्क) आज ११ जून रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी पदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, पदभार स्विकारताच त्यांनी मोठी घोषणा केली, मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प ना. जाधव यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार आहे. गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण काम करणार आहे. देशातील सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट आरोग्य सुविधांचा लाभ कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले.