BREAKING तुपकरांची तब्येत अत्यावस्थ; साखरेची पातळी कमालीची घसरली; तुपकरांना हाइपोग्लाइसीमिया? डॉक्टर म्हणाले, कोमात जाऊ शकतात;

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय होईपर्यंत अन्नत्याग सुरूच ठेवण्याचा तुपकरांचा निर्धार...
 
Tupkar
फुलंब्री(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज, २८ नोव्हेंबरला चौथा दिवस आहे. अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवत तुपकर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईला निघाले आहेत. दरम्यान आत्ता हाती आलेल्या वृत्तानुसार तुपकर सध्या फुलंब्री जवळ पोहचले असून त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे. तुपकर यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमालीची घसरली आहे.
मुंबईला निघालेल्या तुपकर यांच्यासोबत प्रशासनाने एक वैद्यकीय पथक पाठवले आहे. या पथकाने भोकरदन मध्ये तुपकरांची तपासणी केली, त्यावेळी तुपकर यांची तब्येत प्रचंड खालावली असल्याचे दिसून आले. तुपकर यांच्या शरीरातील साखरेची पातळी ५१ पर्यंत खाली आली आहे. साखरेची पातळी ५० पर्यंत खाली येणे अतिशय धोक्याचे मानले जाते. यामुळे तुपकर यांना हाइपोग्लाइसीमिया होण्याची भीती आहे. अति अशक्तपणा, चक्कर येणे, घाम फुटणे, डोळ्यासमोर अंधार येणे, थरथरणे , मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने तुपकर कोमात जाऊ शकतात असे वैद्यकीय तज्ञांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले. तुपकर यांना सध्या तातडीच्या उपचाराची गरज आहे.मात्र तुपकर यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला नकार दिला आहे. मंत्रालयात बैठक होऊन मागण्या संदर्भात ठोस निर्णय होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग सुरूच ठेवण्याचा निर्धार तुपकर यांनी केला आहे.