BREAKING शेलसुर ग्रामस्थांनी एसटी बस अडवली; एसटीवर महायुतीची जाहिरात..

 

चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील शेलसुर येथे संतप्त ग्रामस्थांनी एसटी महामंडळाची बस अडवली आहे. एसटी बसवर महायुतीची जाहिरात आहे. सरकारी मालमत्तेवर राजकीय पक्षाची जाहिरात कशी असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय.

Advt
  लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे १२ दिवस उरले आहेत. काल चिखली येथे प्रवेशद्वारावर शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेली मशाल झळकत होती, त्या संदर्भातील वृत्त बुलडाणा लाइव्ह वर प्रकाशित होताच निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मशाल हटवली होती. दरम्यान आज चिखली आगाराची बस क्रमांक एम एच ४० ,एक्यू ६२८१ ही डोंगरशेवली वरून चिखली कडे जात असताना शेलसूर मध्ये ग्रामस्थांनी अडवली. बस वर महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करणारे जाहिरात होती, त्यामुळे अनेकांनी त्यावर सवाल उपस्थित केलाय. 
आगार प्रमुख म्हणतात....
दरम्यान यासंदर्भात चिखली आगाराच्या आगार प्रमुखांना विचारणा केली असता राज्यातील १००० बसेसवर जाहिराती लावण्याचे आदेश आल्याचे त्यांनी सांगितले. एका जाहिरात कंपनीला हे कंत्राट दिले असून त्यांनी या जाहिराती लावल्याचे ते म्हणाले.