BREAKING रविकांत तुपकर आंदोलन अपडेट!तुपकरांची न्यायालयात रवानगी! न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष....

 
Bls
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच त्यांना काल रात्री उशिरा पोलिसांनी  येथील राजुर घाटातून  ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मेहकर येथे हलवण्यात आले, मात्र मोठा तणाव निर्माण होत असल्यामुळे त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रात्रीपासून ते शहर पोलीस ठाण्यात दाखल होते दरम्यान, आता नुकतेच पुढील प्रक्रियेसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले आहे.
सोयाबीन कापसाच्या दरवाढीबाबत हे आंदोलन सुरू असून अटकेची कारवाई टाळण्यासाठी तुपकर १७ जानेवारीलाच भूमिकत झाले होते. पोलिसांचा शोध कसून सुरू होता. तरीदेखील तुपकर पोलिसांच्या हाती लागलेच, त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार सगळं काही करत आहे. न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सुनावणीची प्रतीक्षा तुपकर समर्थकांना लागून आहे.