BREAKING रविकांत तुपकर गायब! पोलिसांकडून शोधाशोध सुरू; रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अटकेची शक्यता! तुपकरांच्या घराला पोलिसांचा गराडा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अटकेसाठी पोलीस सरसावले आहेत. १९ जानेवारीला रेल्वे रेको आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कालच तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरम्यान पोलिसांकडून अटकाव होण्याची कुणकुण लागताच तुपकर भूमिगत झाले आहेत. पोलिस तुपकर यांचा कसून शोध घेत आहेत.
आज सकाळ पासूनच बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांच्या घराला गराडा घातला. तुपकर घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुपकर नेमके कुठे आहेत, यासाठी पोलिस कसोशीने शोध घेत आहेत. विविध पथके तुपकर यांच्या मागावर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. उद्या, १९ जानेवारीला सकाळी तुपकर मलकापूर रेल्वेस्थानकावर रेल्वेरोको आंदोलन करणार आहेत, त्याआधीच तुपकर यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्लॅन आहे.