BREAKING वन बुलडाणा मिशनची श्रीराम वंदना यात्रेला थोड्याच वेळात होणार सुरुवात! मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत जमला रामभक्तांचा मेळा!
यात्रेचे थेट प्रक्षेपण बुलडाणा लाइव्ह वर पाहता येणार....
Jan 22, 2024, 06:00 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक असा ठरणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज,२२ जानेवारीला संपन्न होतोय.जिल्ह्यातही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असून वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या नेतृत्वातील "श्रीराम वंदना यात्रा" थोड्याच वेळात सुरू होत आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतून ही यात्रा सुरू होत असून हजारो रामभक्त यासाठी सिंदखेडराजा नगरीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन करून यात्रेला सुरुवात होणार आहे. इंडीयन आयडॉल फेम गायक राहुल खरे हे देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत, थोड्याच वेळापूर्वी ते सिंदखेडराजात पोहचले आहे. जिल्हाभरातून वन बुलडाणा मिशनचे कार्यकर्ते तसेच रामभक्त सिंदखेडराजा नगरीत पोहचले आहेत. या यात्रेचे थेट प्रक्षेपण बुलडाणा लाइव्ह च्या यु-ट्युब प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.