BREAKING ना. रावसाहेब दानवेंसोबत ना. अब्दुल सत्तारही गाजवणार धाड चे मैदान! खा. प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला करणार संबोधित!

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. श्वेताताईंचे आवाहन..

 
Jebbd

धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खा.प्रतापराव जाधव यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. महायुतीचे सर्वच आमदार खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी आपापल्या मतदारसंघात जोमाने भिडले असून खा.जाधव यांना लीड देण्यासाठी आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान शेवटच्या टप्प्यात खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी बड्या नेत्यांच्या प्रचारसभा मतदारसंघात होत आहेत. आज ,२२ एप्रिलच्या सायंकाळी धाड मध्ये  पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार केंद्रिय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांची सभा होणार आहे , आता याच सभेसाठी राज्याचे  अल्पसंख्यांक मंत्री ना.अब्दुल सत्तार देखील येणार असल्याची माहिती थोड्या वेळापूर्वी प्राप्त झाली आहे. आज सायंकाळी रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, ना.अब्दुल सत्तार धाड येथे होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत. यावेळी खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांचीदेखील उपस्थिती राहणार आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चिखलीच्या आ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.

Hbv b

            advt