BREAKING आमदार गायकवाडांची तलवार म्यान! महायुतीच्या संवाद मेळाव्यात आ.संजय गायकवाडांनी सांगितले अर्ज भरण्याचे कारण..! खा.जाधवांना चौथ्यांदा विजयी करण्याचे आवाहन

 
Mla

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल दुपारी आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. सायंकाळी खा.प्रतापराव जाधव यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली होती. आज सकाळी देखील आमदार संजय गायकवाड यांनी लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले होते. मात्र थोड्या वेळापूर्वी बुलडाणा शहरातील धाड नाक्यावर ओंकार लॉन्सवर होत असलेल्या महायुतीच्या संवाद मेळाव्यात आ. संजय गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मी काल दुपारी अर्ज भरला म्हणून खा.प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली असे आ. गायकवाड म्हणाले..

मी काल अर्ज भरला म्हणून अनेक जण कन्फ्युज आहेत. मात्र मी अर्ज भरला म्हणून खा.जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली असे आ.गायकवाड म्हणाले. न रेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि खा.प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा खासदार बनवायचे असल्याचे आ.गायकवाड म्हणाले. यावेळी आ. गायकवाड यांनी खा.प्रतापराव जाधव यांच्या १५ वर्षाच्या कामकाजाचे तोंड भरून कौतुक केले. एकप्रकारे आमदार गायकवाड यांनी तलवार मान्य केल्याचे दिसून आले.