BREAKING उद्योगमंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरद्वारे बुलढाण्यात दाखल!खा.प्रतापराव जाधवांसोबत होणार बैठक; प्रचाराचे मायक्रोप्लॅनिंग करणार

 
बुलडाण
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराचे प्लॅनिंग करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज,१३ एप्रिलला बुलढाण्यात हेलिकॉप्टरद्वारे दाखल झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार खा.जाधव आणि उदय सामंत यांच्यात मलकापूर रोडवरील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये बैठक होणार आहे. 
 सामंत यांचे हेलिकॉप्टर मलकापूर रोडवरील कऱ्हाळे ले आउट येथे उतरले आहे. उद्या मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा असतानाच आज उद्योग मंत्री सामंत आणि प्रतापराव जाधव यांची होणारी बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी सहाही विधानसभेचे आमदार कामाला लागले आहेत. यंदाची ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे खा. जाधवांच्या विजयासाठी सध्या मायक्रो प्लॅनिंग सुरू असल्याचे चित्र आहे..