BREAKING उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या जिल्ह्यात! वाचा कसा आहे दौरा, काय आहे कार्यक्रम....
Dec 8, 2023, 20:46 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ९ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या संतनगरी शेगाव येथे एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्या दुपारी २.१० वाजता हेलिकॉप्टरने विसावा भक्त निवास, शेगाव येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी २.२० वाजता त्यांचे संत श्री गजानन महाराज मंदिर येथे आगमन व राखीव. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दुपारी ३.०० वाजता आयोजित विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी सव्वाचार वाजता ते हेलिकॉप्टरने अकोल्याकडे प्रयाण करणार आहेत. उद्याच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.