BREAKING बुलडाणा लाइव्ह चे भाकीत खरे ठरले! सिद्धार्थ खरातांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन; मेहकर विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता...

 
बुलडाणा

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात यांनी आज,३ सप्टेंबरच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. सिद्धार्थ खरात शिवसेनेच्या वाटेवर असून ते निवडणूक लढवतील असे भाकीत "बुलडाणा लाइव्ह" ने खरात यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्याच दिवशी वर्तवली होती..आता त्यांच्या शिवसेना प्रवेशाचे भाकीत १०० टक्के खरे ठरले आहे.

सिद्धार्थ खरात मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील चालवली आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेचा हक्काचा आहे. हा मतदारसंघ राखीव असल्याने याच मतदारसंघातून शिवसेना सिद्धार्थ खरात यांना उतरवणार असल्याचे जवळपास ठरले आहे. सिद्धार्थ खरात यांच्या प्रवेशावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, आशिष रहाटे उपस्थित होते.