BREAKING ठरल भो! १३ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिखलीत घेणार सभा; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

 
Gbn
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय सूत्रांकडून महत्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ जानेवारीला जिल्ह्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या चिखलीत जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियोजन बैठक आज, खा. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत चिखलीत झाली.
१३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता ही सभा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मैदान कोणते राहील यासंबंधीची चाचपणी सुरू आहे. याच सभेत एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची श्यकता आहे..खास त्या कामासाठीच ही सभा असल्याचे बोलल्या जात आहे.