Amazon Ad

वन बुलडाणा मिशनचे बूथ कमिटी सदस्य उद्या बुलडाण्यात करणार संदीप शेळकेंच्या विजयाचे प्लॅनिंग! बूथ कमिटी सदस्यांच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशन चे संकल्पक संदीप शेळके यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या तयारीत चांगलीच आघाडी घेतली आहे. १२०० पेक्षा अधिक बूथची बांधणी त्यांनी पूर्ण केली असून उर्वरित बूथ बांधणी आठवडाभरात पूर्ण होणार असल्याचे वन बुलडाणा मिशनच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान वन बुलडाणा मिशनच्या जिल्हाभरातील बूथ कमिटी सदस्यांचा भव्य मेळावा उद्या,३ फेब्रुवारीला बुलडाण्यात होणार आहे. एका बूथ वरून प्रत्येकी १० याप्रमाणे मेळाव्याला १२ हजार बूथ कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
  वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ सुरू केल्यानंतर बुलडाणा लोकसभा मतदारसंघ संदीप शेळके यांनी पिंजून काढला आहे. जनतेचा जाहीरनामा, जिल्हाभरातील संवाद मेळावे, बूथ बांधणी मेळावा, अलिकडच्या काही दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली श्रीराम वंदना यात्रा हे सगळेच कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाले. याशिवाय संदीप शेळके यांच्या लोकप्रियतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे..
 उद्याच्या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष...
  दरम्यान निवडणूक विजयासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या बूथ बांधणीवर संदीप शेळके आणि त्यांच्या टीमने अतिशय पक्के नियोजन केले आहे. उद्या होणाऱ्या मेळाव्यात प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात करण्याच्या कामांवर चिंतन - मंथन होणार आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचे प्रतिनिधित्व या मेळाव्यात होणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.