तुमचं लेकरू समजून रविकांतला आशीर्वाद द्या! रविकांत तुपकरांच्या आई - वडिलांची भावनिक साद!घरोघरी जाऊन घेतायेत भेटी

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकरांनी जन्म जरी आमच्या पोटी घेतला असला तरी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेसाठी वाहून दिलेला आहे. तुमचं लेकरू समजून रविकांतला मतदान रुपी आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहन रविकांत तुपकर यांचे माता- पिता करीत आहेत. गिताबाई व चंद्रदास तुपकर हे दांपत्य घरोघरी जाऊन जुन्याजाणत्यांसह सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत.
रविकांत तुपकर हे शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेचे उमेदवार आहेत. जो तो आपापल्या परीने रविकांत तुपकरांचा प्रचार करताना दिसून येत आहे. यात रविकांत तुपकरांचे वृद्ध माता-पिता देखील घरोघरी फिरून तुपकरांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. रविकांत तुपकरांनी अनेक जीव घेणे आणि आक्रमक आंदोलने केली आहेत. या प्रत्येक आंदोलनात त्यांच्या मातोश्री गिताबाई तुपकर ह्या ठामपणे रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभ्या असल्याचे दिसून आले आहे. 
  आता तुपकर पूर्ण ताकतीनिशी लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत. आंदोलनात आपल्या लेकाच्या पाठीशी उभी राहणारी ही माऊली आता निवडणुकीतही तुकाराम च्या डोक्यावर मायेचा छत्र धरताना दिसून येत आहे. गिताबाई आणि चंद्रदास तुपकर हे दाम्पत्य घरोघरी फिरून भेटीगाठी घेत आहेत. तुमचं लेकरू समजून रविकांतला आशीर्वाद द्या. तो सर्वसामान्यांचा आहे आणि सर्वसामान्यांचा राहील, असे भावनिक आवाहन हे दांपत्य करत असून त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रचंड आदर आणि आपुलकीचा प्रत्येक येत असून आमचं लेकरू समजून तुपकरांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही देत आहेत. गाव गाड्यातील सर्वसामान्य माणसांचा शहरी भागातील नागरिक देखील तुपकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असल्याचे दिसून येत आहेत. ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने प्रत्येक जण रविकांत तुपकर यांचा प्रचार करत आहे. पक्ष नसला तरी सर्व सामान्यांची मोठी ताकद रविकांतरांच्या पाठीमागे उभी राहत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभर निर्माण झाले आहे.