Amazon Ad

२०२४ ची लोकसभाच काय पुढील २५ वर्षे भाजपाच जिंकणार!केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दावा ; म्हणाले, काँग्रेसने देशाचे नुकसान तर भाजपने चौफेर विकास केला

 
अकोला( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):भारतीय जनता पार्टीने पिढ्यानपिढ्या परिश्रम घेऊन नियोजनपूर्वक काम केल्याने पक्षाला आज चांगले दिवस आले आहे. यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपाच जिंकणार आहे. भाजप बहुमताने जिंकणार आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान होणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे आग्रही प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठनेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
अकोला येथे काल मंगळवारी, ५ मार्चला भाजपची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ- वाशीम, चंद्रपूर , वर्धा, लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या सर्व मतदारसंघातील भाजपचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, कोअर कमिटी सदस्य, प्रबंधन समिती सदस्य , विधानसभा प्रमुख यावेळी उपस्थित होते.
   
नवीन आले तरी जुन्यावर अन्याय नाही
दरम्यान भाजपा मधील इनकमिंग वाढले आहे. पक्षात इतर पक्षातील नेते मोठ्या प्रमाणावर येत आहे. भाजपाची यामुळे शक्ती वाढणार आहे. मात्र हे करताना जुन्या पदाधिकारी, नेते यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
आमदार संजय कुटे यांनी सादर केला बुलढाण्याचा आढावा
दरम्यान बहुचर्चित बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा यावेळी आढावा घेण्यात आला. बुलढाण्यावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपने देखील दावा केला आहे. यावेळी भाजप आमदार संजय कुटे यांनी बुलढाण्याचा आढावा सादर केला.