भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ मनोज जरांगे पाटलांविषयी भलतचं बोलले! म्हणाले..

 
bjp

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर  झालेल्या चप्पलफेकचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यातही उमटले. आमदार पडळकरांनी शांततेचे आवाहन केले असतानाही भाजपा कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. सिंदखेड राजा येथील महामार्गावर भाजपाच्या वतीने रास्ता रोखो आंदोलनाने चप्पल फेक घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता. दरम्यानच भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.

 निषेध व्यक्त करत असताना माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आज जर पडळकरांवर चप्पलफेक होऊ शकते तर उद्या जरांगे पाटील यांच्यावर देखील होईल, एकिकडे सांगायचं असे प्रकार घडवून आणणारी आमची माणस नाही, अन् दूसरीकडे गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे मागे घ्या म्हणून  बोलायचं  अशी दुटप्पी भूमिका  जरांगेंनी मांडू नये, त्यांनी ठाम राहावं, असेही विनोद वाघ म्हणाले. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर इंदापूर येथे ओबीसी एल्गार मोर्चात असताना त्यांच्यावर चप्पल फेक झाली होती.
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा ओबीसी  संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.