बुलडाण्यात काँग्रेस खासदाराविरोधात भाजपची घोषणाबाजी! कर विभागाने टाकलेल्या धाडीत सापडले होते २५० कोटी...

 
Rajkaran
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओडिसा राज्यातील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी कर विभागाने धाड टाकून तब्बल २५० कोटींहून अधिक रोकड जप्त केली. ठिकठिकाणी भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात येत असून बुलडाण्यात आज ११ डिसेंबरला भाजपाचे वतीने खासदार साहू तसेच काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
  माजी आमदार तथा भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करून निषेध दर्शविला. यावेळी शहराध्यक्ष अनंता शिंदे, युवा मोर्चाचे विनायक भाग्यवंत, अण्णा पवार, मंदार बाहेकर, वैभव इंगळे, संजय साखरे,सिंधुताई खेडेकर, उषा पवार, आदी उपस्थित होते.