Amazon Ad

खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज वरवट बकाल येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा घेणार जाहीर सभा!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे आज,२१  एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या दरम्यान ते वरवट बकाल येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करणार आहेत.

  महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ  संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे ही सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सभेला सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार सर्व डॉ. राजेंद्र शिंगणे, जळगांव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर, खामगांव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले, आमदार वसंतराव खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे, माजी आमदार सर्व भारत बोंद्रे, चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, धृपदराव सावळे, शशीकांत खेडेकर, हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला  बुलढाणा लोकसभा मतदार संघातील महायुतीमध्ये समाविष्ट असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे ,राष्ट्रवादी काँग्रेस, री.पा.ई. (आठवले गट), पि.री.पा. व रयत क्रांती संघटना,रा.स.पा, तसेच मित्रपक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.